रत्नागिरी:- गांजा सदृश्य अमंली पदार्थ विक्रीकरिता स्वतःकडे बाळगणाऱ्या संशयित तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद मुफीद भाटकर (वय २५, रा. जामा मस्जिद जवळ, राजिवडा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ५) रात्री दहाच्या सुमारास कोहिनूर हॉटेलच्या मागे आई हॉटेलच्या समोर निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताकडे गांजा सदृश्य अमंली पदार्थ ६ हजार ५०० रुपयांचे १२४ ग्रॅम वजनाचा विक्रीसाठी स्वतःकडे बाळगलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार दिपक साळवी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.









