रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील अभ्युदयनगर येथे महिलेच्या घराच्या काचा फोडून घरात घुसून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार 14 फेब्रुवारी रोजी 9.30 वा. च्या सुमारास घडला. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता हनुमंत यादव (35, अभ्युदयनगर, नाचणेरोड, रत्नागिरी) यांची तब्येत ठिक नसल्याने अस्वस्थ वाटत होते. म्हणून त्यांनी दरवाजा आतील बाजूने लावून घेतला होता. यावेळी दरवाजावर काठीने जोरजोरात मारल्याचा व दरवाजा उघडा असा आवाज ऐकू आला. त्याचवेळी खिडकीच्या काचा फोडून व लाईटचा मीटरचीही तोडफोड करत असल्याचे लक्षात आल्यानंतर ममता यांनी दरवाजा उघडला. यावेळी जगन्नाथ खेडेकर याने घरात घुसून ममता यांच्या मुलावर काठी उगारत तुझा जीव घेतो असे म्हणत अंगावर धावत गेला. याचवेळी मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या ममता यांच्यावर खेडेकर याने खिडकीची काच उचलून मारली. यात त्या जखमी झाल्या. या भांडणात खेडेकर यांचा मुलगा, बायको, सून (नावे माहित नाहीत) तेेथे आली. मुलाने धमकी देत बंदुकीच्या गोळीने तुला ठार मारतो अशी धमकी दिली. त्यानंतर सून व सासू ममता यांच्या अंगावर धावून गेल्या व जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबतची फिर्याद ममता यादव यांनी शहर पोलीस स्थानकात दिल्यानंतर जगन्नाथ खेडेकर याच्यासह 3 जणांवर 324, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.