रत्नागिरी:- अपघात आणि मारहाणीच्या खटल्यातील संशयितांची न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. दयानंद ऊर्फ भाऊ शिवलकर आणि चेतन दयानंद शिवलकर ( रा. मांडवी, रत्नागिरी) अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत.
दि.२४ फेब्रुवारी २०१७ रोजी मांडवी भुते नाका येथे दुचाकीला टेम्पोने धडक दिली आणि त्यांनंतर दुचाकीस्वार आणि त्याचा मित्र यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील २-२ तोळ्याच्या चैन चोरून नेल्याची फिर्याद निखिल प्रकाश नलावडे रा. मुंबई यांनी दयानंद उर्फ भाऊ शिवलकर रा. मांडवी आणि चेतन दयानंद शिवलकर यांच्या विरोधात दाखल केली होती. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता . त्या प्रमाणे त्यांचे विरुद्ध भा. द. वि. कलम ३९४,३३७,२७९,३२३, सह ३४ प्रमाणे केस रत्नागिरीच्या मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो.मतकर यांचे न्यायालयात चालून या केस मध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.आरोपींतर्फे ॲड.सरोज भाटकर, ॲड.सायली हातीसकर, ॲड.साईजीत शिवलकर, ॲड.बंटी सदानंद वणजू यांनी काम पाहिले.