अपघात प्रकरणी बोलेरो चालका विरोधात गुन्हा

रत्नागिरी:- शहरानजीकच्या काजरघाटी येथील वळणात ओम्नी गाडीला ठोकर देत अपघात केल्याप्रकरणी अज्ञात बोलेरो चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना शुक्रवारी 19 मार्च रोजी रात्री 9.45 वा.सुमारास घडली आहे.

याबाबत कौस्तुभ सुभाष पिलणकर (31,रा.पोमेंडी खुर्द,रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानूसार, शुक्रवारी रात्री ते आपल्या ताब्यातील ओम्नी गाडी घेउन काजरघाटी येथील मांडवकर बागेसमोरील वळणातून जात होते.त्याचवेळी टेंभे ते रत्नागिरी जाणार्‍या बोलेरो गाडीचा हौदा त्यांच्या ओम्नीला लागून शेवटपर्यंत घासत गेल्याने त्यांच्या गाडीचे नुकसान झाले.या अपघातानंतर बोलेरो चालक न थांबता निघून गेला.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.