चिपळूण:- चिपळूण शहरातील मार्कंडी येथे प्रवासी उतरवण्यासाठी थांबलेल्या एस.टी.ला ओव्हरटेक करताना तोल जावून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर झाल्याची घटना जून महिन्यात घडली होती. या दुचाकीस्वारावर कराड येथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शुक्रवारी या दुचाकीस्वारावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक विठ्ठल चौगुले ( ६० , खेर्डी ) असे मृत व गुन्हा दाखल झालेल्याचे आहे. नाव बाबतची फिर्याद सुप्रिया मनोज मोरे ( चिपळूण पोलीस स्थानक ) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मार्कंडी येथे चिपळूणकडे जाणारी एस.टी. बस थांबलेली असता दुचाकीने अशोक चौगुले एस.टी.ला ओव्हरटेक करून पुढे जात होते. यावेळी डोक्यावर व तोंडावर पडल्याने गंभीर दुखापत झाली होती.









