दापोली:-दापोलीत प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नी नेहा बागकर व तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत आणखी काही गोष्टींचा खुलासा होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या प्रेमसंबंधात पतीचा अडथळा आहे असे समजून नेहाने मंगेशला हाताशी धरून पती नीलेश बागकरचा काटा काढला. सध्या मंगेश आणि नेहा दोघेही पोलीस कोठहीत आहेत. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या पोलीस कोठडीमध्ये त्यांच्याकडून आणखी काही खुलासे होतात का? खून करण्याचे नेमके कारण काय? खून मंगेश व नेहा या दोघांनीच केला का? नीलेशचा खून हर्णे येथे केल्यावर त्याचा मृतदेह 33 किलोमीटर दूर एका विहिरीत नेऊन टाकण्याचे कारण काय? मृतदेह वाहून नेलेली गाडी नेमकी कुणाची? इत्यादी बाबींचा पोलीस तपास करत आहेत.