चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे येथे सखाराम बिरु बोडेकर (४०, तळवडे-संगमेश्वर) या दुचाकीस्वाराला मागाहून अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना १६ जुलै रोजी घडली होती. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान २२ जुलै रोजी सकाळी ११.०५ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
याबाबतची नोंद सोमवारी सावर्डे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सुभाष चंद्रकांत भुवड (सावर्डे पोलीस ठाणे) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोडेकर हा त्याच्या ताब्यातील दुचाकीने सावर्डे येथे आला असता पाठीमागून येणाऱ्या अज्ञात चारचाकीने त्याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.