रत्नागिरी:- रत्नागिरी ते पावस रस्त्यावर फणसोप सडा येथे अज्ञात वाहनाने एका बैलाला व वासराला धडक दिली. या अपघातमध्ये बैलाचा मृत्यू झाला तर वासरु जखमी झाले आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. ३०) सकाळी सातच्या पुर्वी फणसोप सडा रस्त्यावर घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी ते पावस रस्त्यावर फणसोप सडा येथे अज्ञात वाहनाने निष्काळजीपणे वाहन चालवून एक बैल व वासराला धडक दिली. या अपघातात बैल ठार झाला तर वासरु जखमी झाले. या घटनेची माहिती न देता वाहन चालकांना पलायन केले. या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल अर्चना मगदुम यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केले आहे.