रत्नागिरी:- बेकायदेशीरपणे सुमारे ५ लाख रुपयांचा एमडी- अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बुधवारी, दि. ९ मार्चला त्यांना ठोठावलेल्या कोठडीची मुदत संपली होती. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. शियाद ए. के. (२५) आणि नजफ मोइदु नौफल (२३, दोन्ही रा. केरळ) अशी पोलीस कोठडी सुनावलेल्या दोघांची नावे आहेत .
रत्नागिरीतील रहाटाघर ते मांडवी जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवार, दि. १ मार्च रोजी पहाटे हे दोघेही संशयास्पदरीत्या फिरत होते. यादरम्यान गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्यांना हटकले होते. त्यांतर त्यांची कसून चौकशी केल्यानंतर, ते राहत असलेल्या लॉजच्या रूममधून त्यांच्या बॅगमधून अमली पदार्थ हस्तगत केला होता. दरम्यान, हा अंमली पदार्थ त्यांनी कोणाकडून खरेदी केला होता, याचा तपास पोलीस घेत आहेत.









