Friday, October 2, 2026
spot_img
Home गुन्हेगारी हिंदू कॉलनी येथून २६ वर्षीय तरुणाचे अपहरण; गुन्हा दाखल

हिंदू कॉलनी येथून २६ वर्षीय तरुणाचे अपहरण; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील शिवाजी स्टेडियमच्या बाजूला असलेल्या हिंदू कॉलनी परिसरातुन एका २६ वर्षीय तरुणाचे अज्ञात इसमाने अज्ञात कारणातून अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १४०(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला. फिर्यादी सुनंदा रमेश बजंत्री (वय ३५, सध्या रा. हिंदू कॉलनी, शिवाजी स्टेडियमच्या बाजूला, रत्नागिरी; मूळ रा. हत्रखाळ, ता. व जि. विजापूर, कर्नाटक) यांच्या पतीचे (रविंद्र गुप्ता) कन्स्ट्रक्शन साईटवरून त्यांचा मुलगा परशुराम रमेश बजंत्री (वय २६) याला अज्ञात व्यक्तीने कुठल्यातरी कारणातून बळकावून किंवा पळवून नेले आहे. या प्रकरणी २९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ६ मिनिटांनी रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.