Sunday, May 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी हातखंबा-सनगरे वाडीतील प्रौढाचा विहिरीत पडून मृत्यू

हातखंबा-सनगरे वाडीतील प्रौढाचा विहिरीत पडून मृत्यू

रत्नागिरी:- हातखंबा-सनगरे वाडी येथील बेपत्ता झालेल्या प्रौढाचा मृतदेह आंब्याच्या बागेतील विहीरीत सापडला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महेंद्र गोविंद सनगरे (वय ४०, रा. सनगरेवाडी, हातखंबा) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १४) दुपारी दीडच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेंद्र सनगरे हे सोमवारी (ता. १२) जानेवारीपासून बेपत्ता झाले होते. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली होती. नातेवाईक व पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु असताना त्याचा भाऊ रवींद्र गोविंद सनगरे हा शोध घेत असताना रत्नागिरी ते निवळी रस्त्यावरील जांभोळकरीन मंदिर समोरील एका आंबा कलमांच्या बागेतील विहिरीत त्याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे.