Tuesday, October 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी हातखंबा येथे दुचाकी स्लिप झाल्याने अपघात; स्वार जखमी

हातखंबा येथे दुचाकी स्लिप झाल्याने अपघात; स्वार जखमी

रत्नागिरी:- हातखंबा येथे दुचाकी स्लिप झाल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये स्वार जखमी झाला असून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उदय मनोहर सुतार (वय ५५, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) अस जखमी स्वाराचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ५) सकाळी अकराच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उदय सुतार हे हातखंबा-भाबल धाबा समोरील रस्त्यावरुन जात असताना अचानक दुचाकी स्लिप झाल्याने ते पडले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले असून या अपघाताची नोंद जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत करण्यात आली आहे.