रत्नागिरी:- हनुमान जन्मोत्सव सोहळ्यासाठी गावी आलेल्या ठाणेतील पोलिसाचा ह्दयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवार 5 एप्रिल रोजी घडली. संजय मोरे (56) असे या पोलिसाचे नाव आहे. मोरे हे ठाणे शहरातील राबोडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस फौजदार म्हणून कार्यरत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय मोरे हे जन्मोत्सव सोहळ्यासाठी कुटुंबासह कारमधून आले होते. 5 एप्रिल रोजी दुपारी 2 च्या सुमारास ते चिपळूण तालुक्यातील तिवरे या आपल्या सासरवाडीच्या घरी पोहचले होते. यावेळी मोरे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी उपचारासाठी शहरातील रूग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोरे यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.