नाचणे लिंक रोडवर चुकीच्या दिशेने वाहन चालवित अपघात; दुचाकीचेही नुकसान
रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक देत अपघात केल्याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना रविवार 23 ऑगस्ट रोजी रात्री 10 वा.सुमारास साळवी स्टॉप येथे घडली होती.
याप्रकरणी पोलिस हेड काँस्टेबल रणजित जाधव यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री संदिप लक्ष्मण भरते (32) हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-अेआर-0159) ही घेउन कोल्हापूर ते रत्नागिरी शहर मुख्य रस्ता असे येत होते. त्याच सुमारास अज्ञात दुचाकीस्वार आपल्या ताब्यातील दुचाकी घेउन रत्नागिरी शहर ते नाचणे लिंक रोड येथे जाण्यासाठी एकमार्गी रस्त्याने चुकीच्या दिशेने जात असताना त्याने संदीप भरते यांच्या दुचाकीला धडक देत अपघात करुन पळून गेला. यात संदीप भरते यांन किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे.









