रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत पद्माकर वाघधरे (वय ३२, रा. जयगड, सडेवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जयगड ते किल्ला जाणाऱ्या रस्त्यावर निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताकडे मद्यपरवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्याच्या उद्देशाने हातात मद्याची विदेशी बाटली घेऊन असलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी पोलिस शिपाई पवन पांगरीकर यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









