समाजकल्याण ऑफिसजवळून दुचाकीची चोरी

रत्नागिरी:- रत्नागिरी समाज कल्याण भवनच्या परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली. १५ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १.१८ च्या दरम्यान ही चोरी झाली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र मधुकर साळवी (वय ५६, रा. आरोशी-संगमेश्वर) यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (एमएच ०८ एडब्ल्यू २७६९) ही दुचाकी समाज कल्याण भवन सेंटरजवळ उभी केली होती. अज्ञात व्यक्तीने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली.

या घटनेनंतर फिर्यादी साळवी यांनी तात्काळ रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.