वादळानंतर समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर जेली फिश

रत्नागिरी:- रत्नागिरीतल्या समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या संख्येनं जेली फिश आढळून आले आहेत. वादळी परिस्थिती, खोल समुद्रात सुटलेले वारे, समुद्रातील अंतर्गत प्रवाहातील बदलामुळे या जेली फिश किनारी भागाकडे फेकल्या गेल्या आहेत.

रत्नागिरीतल्या समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या संख्येनं जेली फिश आढळून आले आहेत. वादळी परिस्थिती, खोल समुद्रात सुटलेले वारे, समुद्रातील अंतर्गत प्रवाहातील बदलामुळे या जेली फिश किनारी भागाकडे फेकल्या गेल्या आहेत. या जेली फिश जांभळ्या रंगाच्या सिंहाच्या आयाळाप्रमाणे असल्याने त्यांना लायन्स मेन असं देखील म्हटलं जातं. दरम्यान किनाऱ्याच्या वाळूत रूतल्याने हजारो जेलीफिशचा मृत्यू झाला आहे. जली फिश प्रचंड विषारी असतात, त्यांचा अंगाला स्पर्श होताच तीव्र वेदना होते, त्यामुळे या माशांपासून दूर राहण्याचं आवाहान करण्यात आलं आहे. साधारणपणे समृद्रात 20 ते 25 वाव खोल हे जेली फिश आढळून येतात, ते कधीकधी समुद्राच्या पुष्ठ भागावर देखील तरंगतात.

मोठ्या संख्येनं जेली फिश समुद्राच्या किनाऱ्यावर आल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आरे वारे, गणपतीपुळे, माडबन,सागरीनाटे, आंबोळगड, गावखडी, भाट्ये, आरेवारे, मालगुंड या किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात जेली फिश आढळून आले आहेत, त्यामुळे नागरिकांना समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.