Thursday, September 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी वाटद येथे मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

वाटद येथे मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद येथे लोकवस्तीच्या ठिकाणी जंगली झाडाच्या आडोशाला मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर नंदकुमार पवार (वय २७, रा. चाफेरी मराठवाडी, रत्नागिरी) असे मद्यपान करणाऱ्या संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २३) दुपारी दोनच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयूर पवार हा लोकवस्तीच्या ठिकाणी जंगली झाडाच्या आडोशाला मद्यपान करत असताना आढळला. या प्रकरणी रवींद्र आठवले यांनी जयगड सागरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.