गुहागर:- गुहागर वरचापाट बाग मार्गावर एसटी आणि दुचाकीमधील अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज सायंकाळी (दि. २) घडली. यामध्ये दोघेजण जखमी आहेत. यामध्ये शुभम सुभाष कदम (वय 20 रा. रानवी) या अपघातामध्ये मृत्यू झाला.
आज सायंकाळी (दि. २ मार्च) शुभम सुभाष कदम, साहिल नरेश पवार (वय 20 रा. रानवी) आणि प्रणव प्रमोद मोहिते (वय १९ रा. त्रिशूल) हे तिघेजण दुचाकीवरून रानवीकडून गुहागरकडे निघालेले होते. गुहागर वेलदूर या मार्गावरून जाणाऱ्या एसटीने जांभळादेवी येथे दुचाकीस्वारांना धडक दिली. यामध्ये शुभम , प्रणव आणि साहिल हे दुचाकीस्वारील तिघेजण गंभीर जखमी झाले. तिघांनाही गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र यामध्ये शुभम कदम याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आला. तर साहिल पवार, प्रणव मोहिते यांच्यावर गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.









