Saturday, July 11, 2026
spot_img
Home लांजा लांजातील तरुण मॅकॅनिक दोन दिवसांपासून बेपत्ता

लांजातील तरुण मॅकॅनिक दोन दिवसांपासून बेपत्ता

लांजा:- लांजा येथील आसगे, बेनी, निवदेकरवाडी परिसरातील एक तरुण मॅकॅनिक गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सचिन नारायण निवदेकर (वय २६) असे या बेपत्ता तरुणाचे नाव आहे.

सचिन हा ७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी येथे कामावर जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, तो अद्याप घरी परतला नसून त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून आलेला नाही. सचिनचे वर्णन सांगायचे झाले तर त्याची उंची ५ फूट ५ इंच असून रंग सावळा, चेहरा त्रिकोणी, काळे वाढलेले केस आणि नाक सरळ आहे. तो बेपत्ता झाला तेव्हा त्याने लाल रंगाचा कॉलर असलेला हाफ टी-शर्ट आणि काळ्या रंगाची हाफ पॅन्ट परिधान केली होती. तसेच, त्याच्याकडे पांढऱ्या रंगाची ॲक्टिव्हा गाडी आणि वन प्लस नॉर्ड (ऑफ व्हाईट कलर) मोबाईल असून त्यावर ९३७३४३७९७० हा मोबाईल क्रमांक सुरू आहे. सचिनच्या बेपत्ता होण्याची खबर त्याचा भाऊ सतीश नारायण निवदेकर याने ९ जुलै २०२६ रोजी लांजा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे हे करत आहेत.