रेल्वे प्रवासात चोरट्याकडून मोबाईल लंपास

रत्नागिरी:- रेल्वे प्रवासात प्रवाशाचा मोबाईल चोरट्याने पळविला. अज्ञाताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. २२) दुपारी सव्वादेन ते रात्री साडेआठ या कालावधीत कारवार रल्वेस्टेशन ते रत्नागिरी रेल्वे
स्टेशन दरम्यान घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अब्दुल अबु बखर रशीद हे बुधवारी दुपारी ते जामनगर एक्सप्रेसने प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान ते झोपी गेले असताना या संधीचा फायदा घेत अज्ञाताने त्यांचा १२ हजाराचा मोबाईल पळविला. या प्रकरणी अब्दुल रशीद यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.