रेल्वे प्रवाशाची मोबाईलसह रोख रक्कम लांबवली

चिपळूण:- नागपूर स्पेशल एक्स्पेसमधून प्रवास करताना बॅगेमधील मोबाईलसह रोख रक्कम असा एकूण 17 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरीस गेल्याची घटना 3 मार्च रोजी घडली होती. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची फिर्याद अजय पालसिंग राणा (57, नाशिक) यांनी दिली. राणा हे 3 मार्च रोजी नागपूर स्पेशल एक्स्पेसमधून मडगाव ते नाशिक प्रवास करताना ते झोपेत असताना अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग चोरुन नेली. त्यामध्ये 12 हजार रूपये किंमतीचा मोबाईल तसेच रोख रक्कम 5 हजार रुपये होती. ते चिपळूण रेल्वेस्थानकात आले असता त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यानुसार राणा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.