रेल्वेतून पडलेल्या अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

रत्नागिरी:- निवसर ते आडवली रेल्वेस्टेशन दरम्यान ट्रक बेशुद्ध व जखमी अवस्थेत आढळलेल्या अनोळखीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या अनोळखी तपासून मृत घोषित केले. हि घटना शनिवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवसर ते आ़डवली येथे रेल्वे रुळावर अनोळखी बेशुद्ध व जखमी तरुण आढळला. त्याचे अंदाजे वय ३५ आहे. नाव गाव पत्ता माहित नाही. कोकण रेल्वेने प्रवास करताना शुक्रवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ट्रेन मधून पडला. तेथील ट्रॅकमनला दिसला. त्याने निवसर रेल्वे स्टेशन मास्तर यांची माहिती दिली. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. रात्री दोनच्या सुमारास उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.