रत्नागिरी:- ७० ब दाव्याच्या निकालाची ऑर्डर तक्रारदाराच्या बाजू देण्यासाठी पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या राजापुरातील नायब तहसीलदार याना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
राजापूर तालुक्यातील एका तक्रारदाराचा ७० ब चा दावा येथील महसुली कार्यालयात प्रलंबित होता या दाव्याच्या निकालाची ऑर्डर तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी नायब तहसीलदार अशोक गजानन शेळके यांनी तक्रारदार यांच्याकडे पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती तडजोडी अंती दहा हजार रुपयांवर तोडगा पडला होता.
तत्पूर्वी तक्रारदार यांनी रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डिवाएसपी पी सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राजापूर महसूल कार्यालयात सापळा रचला होता ठरल्याप्रमाणे यातील तक्रारदार दहा हजार रुपयांची लाचेची रक्कम घेऊन महसूल कार्यालयात दाखल झाले त्यावेळी नायब तहसीलदार अशोक गजानन शेळके यांना 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
ही कारवाई पो. नि. प्रविण ताटे, स.फौ. संदीप ओगले, पो.ह. संतोष कोळेकर, विशाल नलावडे, पो.शि. हेमंत पवार, राजेश गावकर आदींनी केली.