Saturday, May 16, 2026
spot_img
Home गुन्हेगारी राजापुरात दोन तरुणांची एकमेकांना मारहाण, मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा

राजापुरात दोन तरुणांची एकमेकांना मारहाण, मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा

राजापूर:- राजापूर तालुक्यातील दत्तभेळ, गुरववाडी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत राजापूर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक ममता विश्राम नामये यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, आरोपी दिवेश अनिल गुरव (२०) आणि अनुराग अरविंद गुरव (२३, सध्या रा. राजापूर गुरववाडी) यांनी जकात नाका दत्तभेळ सेंटरसमोर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी ८ मे रोजी जारी केलेल्या आदेशानुसार दोघांनी जमाव करून एकमेकांना मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी आरोपी दिवेश गुरव आणि अनुराग गुरव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.