रत्नागिरी:- शहरातील सन्मित्रनगर येथे बंद घराच्या मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप-कडी कोयंडा उचकटून चोरट्याने घरात प्रवेश केला. तसेच बेडरुम मधील कपाटातील सोन्या-चांदीचे व रोख रक्कम असा ६ लाख ७ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल पळविला. घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २६ ते २८ जानेवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सुतेज, सन्मित्रनगर, रत्नागिरी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार
फिर्यादी तेजस मोरेश्वर नगराळे (वय ३३, रा. मुळ ः सुतेज, सन्मित्रनगर-रत्नागिरी. सध्या रा. पृथ्वी हाईटस फ्लट नं ए-२०४, सेक्टर १९, उल्वे नवी मुंबई) यांचे सन्मित्रनगर येथे घर आहे. तीन दिवसांच्या मुदतीत चोरट्याने फिर्यादीच्या घराचा मुख्य दरवाजाला लावण्यात आलेले कुलूप कडी-कोंयडा कोणत्यातरी धारदार हत्याराने उचकटून घरात प्रवेश करुन घराच्या बेडरुमध्ये असलेल्या लोखंडी कपाटामधील लॉकरमध्ये ठेवलेले फिर्यादींच्या आईचे सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम पळविली. यामध्ये २ लाख ४३ हजार २५० रुपये किमतीचे ३४.७५० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या. १ लाख ८५ हजार २९० रुपये किमतीचे २६.४७० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, ३९ हजार ५५० रुपयांचा ५.६५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील कर्णफुले जोड.१७ हजार ५०० रुपये किमतीचे २.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील साखळ्यांचा जोड. ३२ हजार ९०० रुपयांचा ४.७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील चौकोनी आकाराचे टॉपचा जोड. १९ हजार २५० रुपये किमतीचे २.७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील चौकोनी आकाराचे टॉपचा जोड, २९ हजार १९० रुपये किमतीचे ४.१७० ग्रॅम वजनाची सोन्याची आंगठी, २४ हजार ५०० रुपयांचे ३.५ ग्रॅम वजनाचे सोन्याची अंगठी. तसेच ७ हजार किमतीचे सोन्याच्या व मोती असलेल्या दोन नथी. ३ हजार ५०० रुपये किमतीचे ५०० मिलीचे चार सोन्याचे गोलाकार मणी. दीड हजार रुपयांचे चांदिचे पैजण, ५०० रुयांची दहा ग्रॅम वजनाची चांदीची नाणी. रोख रक्कम ४ हजार असात एकूण ६ लाख ७ हार ९३० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला.
दरम्यान, फिर्यादी तेजस नगराळे हे मुंबई येथून रत्नागिरीत आल्यानंतर त्यांनी घराची सर्व पहाणी करुन शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.









