रत्नागिरी:-शहरालगतच्या रसाळवाडी, शांतीनगर येथे रस्त्यालगत हॅन्डल लॉक करुन ठेवलेली होंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी चोरीला गेली. ही घटना शनिवार 14 मे रोजी घडली. याबाबतची फिर्याद अनिकेत खेडेकर (30, रसाळवाडी, शांतीनगर) यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडेकर यांनी घराच्या कंपाउंड लगत असलेल्या रस्त्याला गाडी लॉक करुन रात्री घरी गेले होते. सकाळी येवून पाहतात तर त्यांची गाडी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञातावर भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.