रत्नागिरी शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; सलग दुसरा बंगला फोडण्याचा प्रयत्न

रत्नागिरी:- शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. छत्रपती नगर येथे बंगला फोडून 15 तोळे सोने आणि रोख रक्कम लंपास केल्या नंतर चोरट्यांनी आणखी एक बंगला फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र हा बंगला फोडण्यात चोरट्यांना यश आले नाही. शहरातील रमेश नगर येथे बंगला फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. मात्र येथून कोणतीही वस्तू गेलेली नाही. सलग झालेल्या चोऱ्यांमुळे शहरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.