रत्नागिरी:- रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाचा 11 हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञाताने लांबवला ही घटना 13 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.27 वा. सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे घडली आहे.
आशिषकुमार नागरभास कोसड (रा.सुतर,गुजरात) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात शनिवार 29 मार्च रोजी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 13 जानेवारी रोजी ते मडगाव ते अहमदाबादला जाण्यासाठी पोरबंदर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेसने प्रवास करत होते. ही ट्रेन रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर आली असता त्यांचा सिटवर ठेवलेला मोबाईल चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.









