Thursday, May 14, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीत 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू

रत्नागिरीत 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू

रत्नागिरी:- येथील आंबेडकरवाडीत राहणाऱ्या दीप्ती दिलीप कांबळे (वय २८) या तरुणीचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ०१ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. दीप्तीला लहानपणी टीबीचा आजार झाला होता आणि औषधोपचाराने ती बरी झाली होती. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून तिला पुन्हा अशक्तपणा जाणवत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ०१ मे रोजी रात्री दीप्ती तिच्या कुटुंबीयांसोबत बोलत असताना अचानक बेशुद्ध झाली. तिला तातडीने चिंतामणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.