रत्नागिरीत सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन; पाच जणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या पाच तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुयोग जितेंद्र मयेकर (२४, काळबादेवी, मयेकरवाडी,रत्नागिरी), मृणाल रोहिदास जोशी (वय ३५, रा. काळबादेवी, रत्नागिरी), रवींद्र बबन माने (३२, रा. रसाळवाडी, नाचणे, रत्नागिरी), शुभम प्रकाश चव्हाण (३०, रा. तांबटआळी, रत्नागिरी), गणेश दशरथ पवार (३८, रा. तांबटआळी, नवलाई देवाळाच्या बाजूला रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना बुधवारी (ता १) रात्री अकरा ते एकच्या सुमारास साळवी स्टॉप येथील जलतरण तलाव येथे निदर्शनास आल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित मध्यरात्री सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल आशिष भालेकर, पंकज पडेलकर, पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे, सहायक पोलिस फौजदार दिपक साळवी, पोलिस हेड कॉन्स्टेबल अमोल साळवी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.