Thursday, May 21, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मेर्वी येथे महिलांना लाकडी दांडक्याने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

मेर्वी येथे महिलांना लाकडी दांडक्याने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील खालची म्हादयेवाडी-मेर्वी येथे पुर्वीच्या जमीन जागेच्या वादातून दोन महिलांना लाकडी दांड्याने मारुन शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देणाऱ्या दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश कृष्णा भातडे व संतोष कृष्णा भातडे (रा. मेर्वी खालची म्हादयेवाडी, रत्नागिरी) असे संशयितांची नावे आहेत. ही घटना रविवारी (ता. १७) रात्री साडेसातच्या सुमारास मेर्वी-खालची म्हादयेवाडी मांडवकर स्टॉप येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सौ. सुजाता प्रकाश भातडे (वय ४०, रा. मेर्वी खालची म्हादयेवाडी, रत्नागिरी) या त्यांची मुलगी नेहा अशा चालत जात असताना संशयित प्रकाश व संतोष भातडे यांनी पुर्वीच्या कौटुंबिक व जमीन जागेच्या वादातून फिर्यादी यांची मुलगी नेहा हिला लाकडी दांड्याने मारहाण करुन शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच संशयित संतोष भातडे यांनी तिचे कपडे ओढून तिला जमीनवर पाडले. या प्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकित मुलीने जबाब दिला. पोलिसांनी एमएलसीचे कागदपत्र पुर्ण करुन अधिक तपासासाठी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात पाठवले. या प्रकरणी पुर्णगड पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.