Tuesday, July 28, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मिरजोळेत गावठी हातभट्टीवर एलसीबीची धाड; एकाला अटक

मिरजोळेत गावठी हातभट्टीवर एलसीबीची धाड; एकाला अटक

१.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त;

रत्‍नागिरी:-/शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शहरानजीकच्या मौजे मिरजोळे पाटील वाडी या ठिकाणी धाड टाकत तब्बल 1 लाख 37 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एकाला ताब्यात घेतले.

प्रशांत जगन्नाथ पंडये (44, रा, पंडेय वाडी मिरजोळे ता. जि. रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिरजोळे पाटीलवाडी येथे काही लोक गावठी हातभट्टीच्या दारुची निर्मिती करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्‍या माहितीच्या अनुषंगाने मौजे मिरजोळे गावी या पथकाने छापा मारून गावठी हातभट्टी दारू गाळण्याचे साहित्य गुळ नवसागर मिश्रीत रसायन गावठी हातभट्टी दारू असा एकूण 1लाख 37 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, पोलिस हेड काँस्टेबल शांताराम झोरे,नितीन डोमणे,बाळू पालकर,भैरवनाथ सवाईराम,योगेश शेट्ये आणि दत्ताराम कांबळे यांनी केली आहे.