Thursday, June 25, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मिरकरवाडा जेटीवर कारची काच फोडून 10 लाखांची रोकड चोरीला

मिरकरवाडा जेटीवर कारची काच फोडून 10 लाखांची रोकड चोरीला

रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा जेटी येथील रस्त्यावर पार्क केलेल्या मोटारीतून चालक सिटवर ठेवलेली १० लाख रुपयांची रक्कम चोरट्याने पळविली. भर दुपारी मोटारीची मागील काच फोडून ही रक्कम पळविली. चोरट्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चक्क पालिका मतदान प्रक्रिया एक दिवस आधी ही घटना उघडकीस आली.

ही घटना सोमवारी (ता. १) दुपारी सव्वा बारा ते एक च्या सुमारास मिरकरवाडा जेटी रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी मुबीन मोहंमद मुल्ला (वय ५०, रा. गोळप, ता. जि. रत्नागिरी) यांचा मच्छीमारी व्यवसायिक आहेत. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या एकूण चार पर्ससिनेट बोटी आहेत. त्यावर सुमारे १०० ते १२५ खलाशी आहेत. त्या खलाश्यांचा आठवड्याच्या खर्चासाठी पैसे देण्यासाठी मुबीन मुल्ला यांनी त्यांच्या सुनांच्या नावे असलेल्या फेडरल बॅंक-शिवाजीनगर येथून चेकद्वारे १० लाखाची रक्कम काढून ती एका निळ्या रंगाच्या पिशवीत ठेवून ती पिशवी त्यांच्या ताब्यातील मोटार (क्र. एमएच-०८ बीई ५७८६) मध्ये चालकांच्या सीटजवळील बाजूच्या सिटखाली ठेवली. ती मोटार ते मिरकरवाडा जेटी रस्त्यावर आले. तेथे मोटार पार्क करुन फिर्यादी मुबीन हे मिरकरवाडा जेटी येथे गेले. तासाभरात चोरट्याने त्यांच्या मोटारीची पाठीमागील डावी काच कोणत्यातरी कठीण हत्याराने फोडून त्याद्वारे गाडीत प्रवेश करुन सिटखाली ठेवलेले पिशवीतील १० लाखाची रोख रक्कम पळविली. या प्रकरणी मुबीन मुल्ला यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहे.