रत्नागिरी:- तालुक्यातील पाली-माईनवाडी येथील आंब्याच्या झाडाखाली मद्य प्राशन करणाऱ्या प्रौढाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदिप पांडुरंग भोसले (वय ५०, रा. पाली, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २५) दुपारी साडेबाराच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हा मद्य प्राशन करण्याचा परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना आढळला. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









