रत्नागिरी:- शहरातील मांडवी येथे एका टपरीच्या पाठीमागे मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीशैल लक्ष्मण वाळीकर (वय ५३, रा. शिवगंगा अपार्टमेंट, परटवणे, साईमंदिरचे जवळ, रत्नागिरी) असे संशयित मद्यपान करणाऱ्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ९) रात्री साडेआठच्या सुमारास मांडवी येथील एका टपरीच्या पाठीमागे निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित वाळीकर हे सार्वजनिक ठिकाणी विदेशी मद्यपान करत असताना आढळले. या प्रकरणी पोलिस शिपाई विजय आंब्रे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद गुन्हा दाखल केला आहे.









