Friday, August 28, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या दोघा तरुणांविरुद्ध गुन्हा

मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या दोघा तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील लांजा बाजारपेठ येथे मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या तरुणांविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अनिल शिवराम दुड्ये (वय ३६) व निलेश रमेश चव्हाण (वय ३५, दोघेही रा. देवधे मणचेकरवाडी, ता. लांजा) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना सोमवारी (ता. ४) सायंकाळी पाच वाजता लांजा बाजारपेठ येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित दोघेही तरुण मद्यधुंद अवस्थेत लांजा बाजारपेठ येथे फिरत असताना आढळले. या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल वैभवी नारकर यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.