चिपळूण:- मंगला एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगमधील अडीच हजार रुपये रोख व मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १० जुलै रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास चिपळूण रेल्वे स्थानकात घडली.
याबाबतची फिर्याद निलेश्वरी जगदंबा मिश्रा ( ४५ , रा . उत्तरप्रदेश ) यांनी दिली आहे. यानुसार निलेश्वरी मिश्रा १० जुलै रोजी आपल्या कुटुंबीयांसमवेत मंगला एक्स्प्रेसने कारबाग रेल्वे स्टेशन ते झांशी असा प्रवास करत होते. पहाटे ३.३० वाजेपर्यंत त्यांच्याजवळ बॅग होती. मात्र, त्यानंतर चिपळूण रेल्वे स्टेशन येथे जाग आल्यानंतर बॅगेतील अडीच हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केले असल्याचे निदर्शनास आले. यामुळे याची फिर्याद निलेश्वरी यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.









