रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्ये दर्गा येथे इंडिकेटर देवून दुचाकी वळवत असताना रत्नागिरीहून गोळपकडे जाणाऱ्या मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघात स्वार जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
इकबाल हसन सोलकर (वय ६१,रा. गोळप सडा, मुळ नवानगर भाट्ये-रत्नागिरी) असे जखमी स्वाराचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ५) सकाळी आठच्या सुमारास भाट्ये दर्गा येथील वळणावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इकबाल सोलकर हे रविवारी सकाळी दुचाकी (क्र. एमएच-०८ एएम ६३७५) घेऊन गोळप ते भाट्ये येत होते. ते भाट्ये दर्गा येथे दुचाकीचा इंडिकेटर देवून उजव्या बाजूला जात असताना रत्नागिरीहून गोळपकडे जाणारी मोटार (क्र. एमएच-०१ इएम ६५२४) वरिल चालकाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात स्वार इकबाल सोलकर त्यांच्या हाताला आणि कमरेला दुखापत झाली. तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.









