Friday, June 19, 2026
spot_img
Home खेड बोलेरोची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, चालक पसार

बोलेरोची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, चालक पसार

खेड:- घाणेखुंट परिसरात भरधाव बोलेरो पिकअप गाडीने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत बाप-लेक गंभीर जखमी झाल्याची घटना ३१ मे रोजी दुपारी घडली. या अपघातानंतर संबंधित चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​फिर्यादी शशिकांत चव्हाण हे ३१ मे रोजी आपल्या मुलासोबत बजाज प्लॅटिना (MH-०८, बी.बी./९५९३) गाडीवरून घरडा कंपनीत कामावर जात होते. दरम्यान, घाणेखुंट गवळवाडी फाट्याजवळ आरोपी संतोष होळकर याने आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप (MH-०८, बी.के./०२२६) भरधाव आणि हयगयीने चालवत मुख्य रस्त्यावरून अचानक गवळवाडीकडे वळवली. यामुळे समोरून येणाऱ्या शशिकांत यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.

​या अपघातात फिर्यादी शशिकांत चव्हाण यांच्या उजव्या पायाला किरकोळ तर डाव्या खुब्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच, त्यांच्या मुलाच्या डाव्या हाताच्या मनगटाला मुकामार लागून छातीच्या उजव्या बाजूचे हाड क्रॅक झाले आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले असून, आरोपी चालक अपघाताची कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला.

​या प्रकरणी १६ जून रोजी शशिकांत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७६/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपी संतोष होळकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१, १२५(अ), (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ (अ) नुसार कारवाई सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.