मृताच्या आईवर जीवघेणा हल्ल्याच्या गुन्ह्यात सात वर्ष कारावास
रत्नागिरी:- बेलारी बुद्रुक (ता. संगमेश्वर) येथे पुतण्याचे आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन त्याच्या डोक्यात फावडे मारुन खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सहा वर्षांनंतर या खटल्याचा निकाल आज न्यायालयात झाला.
सखाराम बाबाजी सापते (वय ४७, रा. बेलारी बुद्रुक, सापतेवाडी, ता. संगमेश्वर) असे आरोपी नाव आहे. ही घटना २८ जून २०१९ दुपारी सव्वा तीनच्या सुमारास बेलारी बुद्रुक येथे घडली होती. फिर्यादी अर्जुन सोमा सापते (वय ६२, रा. बेलारी बुद्रुक सापतेवाडी, ता. संगमेश्वर) यांचा मुलगा संदीप अर्जुन सापते (वय ३२, रा. बेलारी बुद्रुक, संगमेश्वर) व आरोपी यांची पत्नी यांचे प्रेमसंबंध असल्याचा संशयावरुन आरोपी सखाराम याने २८ जूनला दुपारी तीन च्या सुमारास संदीप सापते यांच्या डोक्यात फावडे मारुन गंभीर जखमी केले. तर फिर्यादी यांची पत्नी तसेच भांडण सोडविण्यासाठी गेलेले साक्षिदार तीन महिलांनाही लाकडी होल्ट्याने मारहाण केली. गंभीर जखमी जखमी झालेल्या दोघांनीही तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देवरुख येथे हलविण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संदिप सापते याला तपासून मृत घोषित केले होते. या प्रकरणी अर्जून सापते यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध भादवी कलम ३०२, ३०७, ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संग्राम पाटील, पोलिस उपनिरीक्षक अस्मिता पाटील करत होत्या. तपासात पोलिसांनी आरोपी सखाराम सापते याला २९ जून २०१९ ला दुपारी दोनच्या सुमारास अटक केली. दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.
सोमवारी (ता. २४) हा खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. अनिरुद्ध फणसेकर यांनी १८ साक्षीदार तपासले. तपासाअंती न्यायालयाने आरोपीला भादवी कलम ३०२ अन्वये जन्मठेप व १० हजार रुपये दंड दंड न भरल्या सहा महिने कैद. भादवी ३०७ मध्ये २ वर्षे शिक्षा व ३ हाजर दंड दंड न भरल्यास एक महिना शिक्षा. भादवी कलम ३२४ मध्ये दोन वर्षे शिक्षा व १ हजार रुपये दंड दंड न भरल्यास १० दिवस शिक्षा तसेच संदिप यांच्या कुटुंबाला १३ हजार रुपये नुकसान भरपाई अशी शिक्षा आरोपीला न्यायालयाने ठोठावली. या खटल्यात सहायक पोलिस निरीक्षक संजय पाटील तसेच पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक तेजस्विनी पाटील व महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल वर्षा चव्हाण यांनी काम पाहिले.









