रत्नागिरी:- शहरानजीकच्या नाचणे येथील फ्लॅटचे कुलुप तोडून त्यात अनाधिकाराने राहिल्याप्रकरणी 4 जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना 5 मार्च 2021 रोजी घडली असून याप्रकरणी शनिवारी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे.
नंदकुमार हिरे,निलीमा हिरे,ललित हिरे,हेमचंद्र हिरे(सर्व रा.गोविंद अपार्टमेंट नाचणे,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत.त्यांच्यविरोधात मनिषा वासुदेव लोकेगावकर (42,रा.बेलापूर,मुंबई) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानुसार,या चार संशयितांनी मनिषा लोकेगावकर यांच्या मालकिच्या गोविंद अपार्टमेंट मधील फ्ॅलटचे कुलूप तोडून त्यात अनाधिकाराने प्रवेश करत त्यात आपले सामान ठेवून ते रहात आहेत.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल गायकवाड करत आहेत.