Thursday, May 7, 2026
spot_img
Home रत्नागिरी पावस-तांबळवाडी येथील वृद्धाची आत्महत्या

पावस-तांबळवाडी येथील वृद्धाची आत्महत्या

पावस:- येथील पावस-तांबळवाडी येथे भाड्याच्या चाळीत रहाणाऱ्या वृद्धाने लोखंडी बाराला गळफास घेऊन आत्महत्या केली. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भिकाजी रंगराव रसाळ (वय ६०, रा. तोडणकर यांची चाळ, पावस-तांबळवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १८) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास निदर्शनास आली.           पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध भिकाजी रसाळ यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणातून भाड्याच्या खोलीत दोन्ही दरवाजांना आतून कडी लावून छताच्या लोखंडी बारला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.