Wednesday, May 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी पावस- गावखडी सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान; संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा

पावस- गावखडी सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान; संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा

पावस:- पावस ते गावखडी जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश दत्ताराम माईन (वय ३८, रा. बंडबेवाडी, कुर्धे, पो. मेर्वी, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २३) दुपारी दीडच्या सुमारास पावस ते गावखडी रस्त्यावरील नामजोशी फाटा कुर्धे येथील पीकअप शेडमध्ये निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित अविनाश माईन हे मद्यपिण्याचा परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल सुदेश शिंदे यांना पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पुर्णगड पोलिस अमंलदार करत आहेत.