पाली अपघात प्रकरणी ‘त्या’ अज्ञात टॅन्कर चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- गोवा-मुंबई महामार्गावर पाली येथील उभी धोंड येथील अपघात प्रकरणी अज्ञात टॅंकर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३१ जानेवारीला रात्री आठच्या सुमारास पाली येथील उभी धोंड येथे घडली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी साहील विजय पवार (वय २३, रा. कारवांचीवाडी, खेडशी, रत्नागिरी) यांचे चुलते अमोल अशोक पवार (वय ३९, रा. गुडलक बेकरी, नाचणे रोड रत्नागिरी) हे नातेवाईकांच्या कार्याला सांगली येथे गेले होते. कार्य आटोपून ते सोबत प्रेम संजय पवार यास घेऊन दुचाकी (क्र. एमएच-०८ वाय ४९१२) वरुन रत्नागिरीकडे येत असताना पाली येथील उभी धोंड येथे त्यांच्या मागून येणारा टॅंकर (क्र. एमएच ४३ सीई ०५०५) वरील चालकाने ठोकर दिली. या अपघातात अमोल पवार यांच्या मृत्यू झाला तर प्रेम पवार हा जखमी झाला. या प्रकरणी फिर्यादी साहिल पवार यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात टॅन्कर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.