Friday, August 21, 2026
spot_img
Home गुन्हेगारी पालीत घरासमोर उभी केलेली स्प्लेंडर चोरीला

पालीत घरासमोर उभी केलेली स्प्लेंडर चोरीला

रत्नागिरी:- तालुक्यातील पाली, घडशीवाडी येथील सुमित्रा चाळीत राहणाऱ्या तरुणाची घरासमोर उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन शिवाजी गोंधळी (वय २६, रा. पाली, घडशीवाडी) हे ड्रायव्हर म्हणून काम करतात. त्यांनी आपली २३ हजार रुपये किंमतीची हिरो स्प्लेंडर प्लस (क्र. एमएच ०८ एव्ही ४२९२) ही मोटारसायकल २० ऑगस्ट रोजी रात्री घरासमोर लावली होती. २० ऑगस्ट रोजी पहाटे १२:३० ते ६:३० या वेळेत अज्ञात चोरट्याने ती लांबवली.
सकाळी फिर्यादीला गाडी तिथे दिसली नाही, त्यांनी आजूबाजूला व नातेवाईकांकडे शोधाशोध केली पण गाडीचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३(२) नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.