दापोली:- उंबर्ले काटेवाडी येथील एका तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून ६५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम चंद्रकांत दवंडे (२६, राहणार भिवंडी मुंबई, सध्या राहणार उंबर्ले) याने तक्रार दिली आहे. शुभम हा मर्चंट नेव्हीमध्ये कामाला असून त्याला भागेश भाग्यम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याने वेगवेगळ्या प्रकारचे ईमेल व मोबाईल क्रमांक वरून मेसेज केले. नोकरीला लावतो असे सांगितले होते. पैसे स्वीकारूनही नोकरीला लावले नाही. फसवणूक झाल्याचे कळताच त्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक अहिरे हे करीत आहेत.









