Thursday, May 14, 2026
spot_img
Home रत्नागिरी नेवरे येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

नेवरे येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील नेवरे येथील वृद्ध जेवत असताना त्याला उलटी झाल्याने ते बाथरुमध्ये पडले. उपचारासाठी त्यांना खासगी दवाखान्यात नेले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपास मृत घोषित केले. बाळकृष्ण महादेव लोगडे (वय ७०, रा. धामणसे-लोगडेवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २२) रात्री दोनच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाळकृष्ण लोगडे यांना ब्लड प्रेशरचा त्रास होता. शुक्रवारी (ता. २१) ते किचन मध्ये जेवत असताना त्यांनी उलटी झाली. बाथरुमध्ये गेले असता ते पडले. तोंडावर पडल्याने त्यांच्या कपाळाल व नाकाला दुखापत झाली. उपचारासाठी नेवरे येथील खासगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितले. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.