Friday, May 1, 2026
spot_img
Home गुन्हेगारी नातेवाईक महिलेनेच लांबवला अडीच तोळ्यांचा सोन्याचा हार

नातेवाईक महिलेनेच लांबवला अडीच तोळ्यांचा सोन्याचा हार

चिपळूण:- घरच्या व्यक्तीनेच विश्वासाला तडा दिल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील खेड महालक्ष्मी नगर येथे समोर आली आहे. आपल्या नातेवाईक महिलेच्या कपाटातील १ लाख ४४ हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार चोरल्याप्रकरणी महिलेवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी श्रीमती मधुबाला श्रीराम दुर्गे (वय ५७, रा. खेड महालक्ष्मी नगर, चिपळूण) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी १ नोव्हेंबर २०२५ ते ४ जानेवारी या दरम्यानच्या कालावधीत घडली. फिर्यादी मधुबाला दुर्गे यांनी आपल्या राहत्या घरातील कपाटात २४.४०० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस ठेवला होता. मात्र, नातेवाईक महिला शिल्पा निरंजन दुर्गे (वय ३०, रा. कौंढर ताम्हाणे, तावडेवाडी, ता. चिपळूण) हिने फिर्यादीच्या संमतीशिवाय कपाटातील सोन्याचा हार चोरून नेला.

​बऱ्याच काळानंतर हा चोरीचा प्रकार लक्षात आल्यावर फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी २०२३ चे कलम ३०५ (अ) नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत. घरगुती वादातून किंवा अन्य कारणातून ही चोरी झाली आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.