रत्नागिरी:- नवेदर (ता. राजापूर) येथे महिलेचे घरातील कपाटात पर्समध्ये ठेवलेले ७२ हजाराचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने पळविले. नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ४ ते ३१ मे २०२५ या कालावधीत नवेदर येथील फिर्यादी महिलेच्या घरात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेने मंगळसूत्र पर्समध्ये बॉक्ससहीत घरातील लाकडी कपाटात ठेवले होते. त्यानंतर ३१ मे च्या दिवशी त्यांनी कपाटातील पर्स काढली व त्यातील मंगळसूत्राचा बॉक्स काढला तो हलका लागला बॉक्स उघडून पाहिला असता त्यातील ७२ हजाराचे मंगळसूत्र सापडले नाही. या प्रकरणी फिर्यादी महिलेने नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्याचे अमंलदार करत आहेत.